Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन...

Listen on:

  • Podbean App

Episodes

Wednesday Jun 10, 2020

रोजच्या कमाईवर स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यक्ती लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावून बसतो आणि नाईलाजाने कुटुंबाला सोबत घेऊन गावचा रस्ता धरतो. जगण्याची नवी आशा मनात घेऊन गावची वाट पायी तुडवत हे कुटुंब निघालंय. पण ही वाट त्यांना एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाते. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षातही अनेक मजूर, कामगार काम नसल्याने अशाच रीतीने आपापल्या गावी निघाले. दुर्दैवाने कित्येक लोक पोहचू देखील शकले नाहीत. आजची गोष्ट ही या सगळ्यांच्या आयुष्याचं एक कल्पनाचित्र आहे.
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in - www.RJPrasad.in

Friday Jun 05, 2020

'लॉकडाऊनच्या गोष्टी' सिरीजमधील ही तिसरी गोष्ट! टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाजा आलाच असेल की ही एका लग्नाची गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न व्हायचंय ते कपल आहे आजच्या पिढीतलं, ज्यांना पारंपरिक विवाह सोहळ्यात होणारा अनेक गोष्टींचा अपव्यय टाळावा असं वाटतं. पण त्यांचे आईवडील मात्र सगळ्याच ९० च्या दशकातील आईवडिलांसारखे आहेत. त्यातल्या त्यात यांना लव्ह मॅरेज करायचंय. इथेही घरचे नकार देतील अशीच शंका जास्त आहे. अशा सर्व छोट्या-मोठ्या अडचणींमधून शेवटी या कपलला मार्ग सापडतो की नाही आणि लॉकडाउनच्या काळात हे सगळं घडत असल्याने त्याचा यांच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ऐका आजचा एपिसोड, 'लव्ह की अरेंज?'
ही स्टोरी लिहिलीये शारदा भवर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in

Wednesday Jun 03, 2020

दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आजची स्टोरी अशाच एक कंडक्टरच्या आयुष्याची आहे ज्याने दंगली पाहिल्या, जाळपोळ पाहिली, आयुष्याच्या चढ-उताराने त्याला नोकरी नकोशी वाटू लागली. पण लॉकडाऊन मुळे असं काही घडलं की त्याच्या जीवनाचा अर्थच बदलला. तर मग ऐका आजची स्टोरी 'प्रवास'!
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय आर जे प्रसाद अर्थात प्रसाद देशमुख यांनी आणि प्रोड्युस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मेसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in

Monday Jun 01, 2020

लॉकडाऊनच्या गोष्टींमधील ही पहिली स्टोरी आहे एका कपलची, ज्यांचं अरेंज मॅरेज झालंय. हे दोघे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे आहेत. पण त्यांच्या याच स्वभावांमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नात्यात एक आश्चर्यकारक बदल घडतो, पण तो चांगला की वाईट हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड आवर्जून शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टींची आपल्याला अपेक्षा असते, पण जे हवं ते सगळं मिळेलच असं नाही आणि बऱ्याचदा आपल्याला जे मिळतं ते आपल्याला हवं त्यापेक्षा कदाचित बेटरही असू शकतं! हेच सांगणारी आमची आजची स्टोरी ऐका आणि कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
- www.RJPrasad.in

Friday May 29, 2020

एक व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन सैरभैर धावतोय, त्याला माहितीये थांबला तर संपला! पण असं काय लागलंय त्याच्यामागे आणि का तो त्याच्यापासून पळतोय? हे जाणून घेण्यासाठी ऐका आमचा आजचा पॉडकास्ट मरण्याच्या क्षणभर आधी कळलं… काही चुका माणसाला आयुष्यभर कळत नाहीत आणि जेव्हा कळतात तेव्हा फार उशीर झालेला असतो, मात्र तेव्हा गेलेली वेळ परत येत नाही. स्टोरीतून मी तुम्हाला संधी देतोय गेलेल्या वेळात परत जाण्याची, सगळं ठीक करण्याची...
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
- www.RJPrasad.in

Tuesday May 26, 2020

गप्प बसून अन्याय सोसणाऱ्याला आपण कोण आहोत हे आठवण करून देणारी आमची तिसरी स्टोरी…पण तुम्ही माणूस नाही!!"
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
- www.RJPrasad.in

Tuesday May 26, 2020

आपलं मन हे फारच चंचल असतं, त्याला स्थैर्य म्हणून कधी नसतंच. असंच एका तरुणाचं मन एका सुंदर तरुणीवर येऊन ठेपलंय आणि त्याचं महत्वाचं कारण आहे पाऊस! पावसात चिंब भिजलेली ती अनोळखी सुंदर मुलगी पाहून हा तरुण तिला दूर घेऊन गेला, तिच्या सोबत चहा प्यायला, तिच्या नाजूक बटांशी खेळला पण तिला याची खबरही नाही! आता तुम्ही म्हणाल "हे कसं शक्य आहे?" अहो शक्य आहे. ऐकून तर पहा आमची दुसरी स्टोरी "आणि गंमत म्हणजे तुला ठाऊकही नाही!"
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
- www.RJPrasad.in

Tuesday May 26, 2020

आम्ही सादर करतोय आमची पहिली स्टोरी, "दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!"
एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा...
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
- www.RJPrasad.in

Saturday May 23, 2020

आम्ही सादर करतोय आमच्या पहिल्या वहिल्या गोष्टीचा ट्रेलर जीचं नाव आहे दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!
एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा... लवकरच....
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
- www.RJPrasad.in

Team Story Junction

Podcast Powered By Podbean

Version: 20240320